दैनिक स्थैर्य | दि. १४ ऑक्टोबर २०२१ | सातारा | काशीळ, ता.सातारा येथील उसाच्या शेतात अज्ञात महिलेचा सांगाडा सापडल्याने एकच खळबळ उडाली. मंगळवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार काशीळ येथील समाधान जगन्नाथ कोळेकर हे गावातीलच राजाराम पांडुरंग हिवरे यांच्या मालकीच्या धारकर नावाच्या शिवारात असलेल्या उसाला खत टाकण्यासाठी मंगळवारी सायंकाळी गेले होते.शिवारात खत टाकत असतानाच त्यांना उसात एक मानवी सांगाडा आढळून आला.याची खबर त्यांनी तात्काळ बोरगाव पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
अधिक तपास करत असता हा सांगाडा महिलेचा असल्याचे निष्पन्न झाले.घटनास्थळी रात्री उशिरा अतिरिक्त पोलीस आधीक्षक अजित बोर्हाडे, पोलीस उपअधीक्षक आंचल दलाल यांनी भेट देऊन तपासकामी मार्गदर्शन केले.या घटनेची फिर्याद समाधान कोळेकर यांनी दिली. बोरगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मयत म्हणून नोंद झाली असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक डॉ.सागर वाघ करत आहेत.