दैनिक स्थैर्य | दि. १४ ऑक्टोबर २०२१ | सातारा | सातारा तालुक्यातील कारंडवाडी येथे एकावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. अमोल साळुंखे असे हल्ला झालेल्याचे नाव असून याप्रकरणी त्यांनी सताारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर विनायक कदम याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, तक्रारदार अमोल दशरथ साळुंखे (वय ३९, रा. कारंडवाडी) यांनी रविवार, दि. १0 रोजी कदम याच्याकडे दिलेले साहित्य परत मागितले म्हणून त्याने साळुंखे यांना शिवीगाळ करतच साहित्य देणार नाही, असे सांगितले. याचवेळी त्याने साळुंखे यांच्या डोक्यात कोयता मारला. याबाबतची तक्रार साळुंखे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिल्यानंतर कदम याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार वायदंडे करत आहेत.