पंतप्रधान आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आढावा घेणार


 

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.२३: कोरोनाचा
प्रादूर्भाव गेल्या काही दिवसांपासून वाढला आहे. या पार्श्वभूमीवर
पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी बैठक घेणार आहेत.
24 नोव्हेंबरला सकाळी 10 किंवा 11 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक
घेणार आहेत. ही बैठक 2 टप्प्यांमध्ये पार पडणार असल्याचं म्हटलं जात आहे.
ज्या राज्यातील कोरोना केसेसची संख्या जास्त आहे, त्या राज्यातील
मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान सर्वात आधी बैठक घेणार आहेत. म्हणजेच पहिल्या
टप्प्यातील बैठकीमध्ये महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दिल्लीचे
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित असतील.

पंतप्रधान मोदी बैठकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 8 राज्यांच्या
मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. यानंतर दुस-या टप्प्यात उर्वरित
राज्यांचे मुख्यमंत्री या महत्वाच्या बैठकीत सामील होतील. दुस-या
टप्प्यातील बैठकीला दुपारी 12 वाजता सुरुवात होणार आहे.

मंदिरांमध्ये गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नवे नियम

या महत्वाच्या बैठकीत प्रत्येक राज्यातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा
घेण्यात येणार आहे. तसेच लस वितरणाच्या धोरणासंदर्भात मुख्यमंत्री चर्चा
होण्याची शक्यता आहे. या बैठकीला मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त राज्य आणि
केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधीही उपस्थित असतील, अशी माहिती सूत्रांनी
दिली आहे. पंतप्रधान मोदींनी याआधी वेळोवेळी सर्व राज्यातील
मुख्यमंत्र्याशी बैठका घेतल्या आहेत.

लॉकडाऊन वाढवणार का?

राज्यासह देशामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली
आहे. त्यामुळे देशासह राज्यात लॉकडाऊन करायचा का, या मुद्द्यावर या बैठकीत
चर्चा होऊ शकते.

महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे, रोहित पवारांवर जबाबदारी?


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!