कराडातील व्यापारयाला संपवण्याचा कट उधळला; सांगलीचे पाच जण गजाआड: जुन्या भांडणातून दिली होती सुपारी


 

स्थैर्य, कराड, दि.२४: कराड रेथील ट्रक व्रापारी असलेल्रा व्रक्तीला मारण्राची सुपारी सांगलीच्रा चौघांनी घेतली होती. त्रासाठी दबा धरून बसलेल्रा चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्रा पथकाने पकडले. त्रांच्राकडून सत्तुर, लाकडी दांडकी हस्तगत करण्रात आली आहेत. 

केरोबा बापु मेटकरी (वर 23 वर्षे, रा.कपवाड रोड सूतगिरणी, सिध्दनाथ कॉलनी, ता. मिरज, जि. सांगली), सलिम आप्पालाल नदाफ (वर 22 वर्षे, रा. अष्टविनारक नगर, कुपवाड रोड विश्रामबाग, ता. मिरज, जि. सांगली), कुमार सोपान कोळी (वर 24 वर्षे, रा. गजराज कॉलनी विश्रामबाग, ता. मिरज, जि. सांगली) प्रदिप बाळु माळी (वर 24 वर्षे, रा. मंगलमुर्ती कॉलनी, कुपवाड ता. मिरज, जि. सांगली), अनिकेत केंगार(रा.गोटे, ता.कराड) अशी संशरितांची नावे असल्राची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्रा पथकाने दिली. रा कारवाईने कराड परिसरात खळबळ उडाली आहे. 

केंद्र सरकारचा आणखी एक डिजीटल स्ट्राईक; तब्बल 43 अ‍ॅप्सवर बंदी

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल यांनी मालमत्तेच्या गुन्हेविरूद्ध परिणामकारक कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने साबळे यांनी एक पथक तयार करून कराड शहर व परिसरात गस्त करीत असताना गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कराड येथील ट्रान्सपोर्टचे व्यापारी यांना जुन्या भांडणाचा राग मनात धरून त्यांना मारणेची सुपारी त्यांच्याच गावातील इसमाने सांगली येथील चौघांना दिली होती. सदरचे युवक व्यापार्‍याला मारण्याच्या उद्देशाने हॉटेल रॉयल पॅलेससमोर महामार्गावर मोटारसायकल व डीओ गाडीवर अंधारात दबा धरून बसलेले होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांनी उड्डाणपुलाचे खाली असलेल्या बोगद्यात सापळा रचला. चौघेजण दोन मोटारसायकलवर संशयितरित्या वावरत असताना दिसले. चौघांना पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघेजण दुचाकीवरून कोल्हापूरबाजूकडे पळून गेले तर बाकीचे दोघांना पोलिसांनी पकडून त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता कराड व आटपाडी येथील इसमाचे सांगणेवरून कराड येथील ट्रक व्यापारी यास मारणेसाठी 50 हजार रूपयांची सुपारी घेतली असल्याचे सांगितले. तर पळून गेलेल्या दोघांजणाना पाचवड फाटा येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन मोटारसायकल, सत्तुर, तीन लाकडी दांडके, मोबाईल असा एकूण 1 लाख 64 हजार 373 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अजर कुमार बंसल, अप्पर पोलीस अधिक्षक धिरज पाटील रांच्रा मार्गदर्शनाखाली सहाय्रक निरिक्षक आनंदसिंह साबळे, पोलीस अंमलदार सुधीर बनकर, शरद बेबले, साबिर मुल्ला, प्रविण फडतरे, गणेश कापरे, केतन शिंदे, रोहित निकम, संकेत निकम, मरुर देशमुख, मोहसिन मोमिन, महेश पवार, संजर जाधव रांनी कारवाईत सहभाग घेतला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!