फलटणमधील त्या ओमिक्रोन बाधितांचे आई – वडील सुद्धा ओमिक्रोन बाधित

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. २४ डिसेंबर २०२१ । फलटण । दक्षिण आफ्रिकेतील युगांडाहून आलेले तिघे जण ओमायक्रॉन बाधित सापडले असताना त्यांच्या संपर्कातील दोघे जण ओमिक्रोन बाधित झाल्याने फलटण तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. हे दोघे ओमिक्रोन बाधितांचे आई-वडील असून त्यांचा ओमिक्रोन अहवाल पॉसिटीव्ह आलेले आहेत, अशी माहिती फलटण तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रांत पोटे यांनी दिली.

फलटण शहरांमध्ये आफ्रिकेतील युगांडा होऊन आलेले एकाच कुटुंबातील चौघे जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यातील तिघांना ओमायक्रॉनची लागण झाली होती. बाधित ज्या अपार्टमेंटमध्ये राहत होते त्यातील सर्व लोकांचे तसेच त्यांच्या आई-वडिलांची असे मिळून ३६ जणांची कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये ३४ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून दोन जणांना म्हणजेच त्यांच्या आई – वडिलांना कोरोनाची लागण झाली आहे. ओमिक्रोन बाबतची चाचणी करून पुणे येथील तपासणीसाठी पाठवले होते. त्यामध्ये त्यांच्या आई – वडिलांचा अहवाल ओमिक्रोन बाधित आलेला आहे, असेही डॉ. पोटे यांनी यावेळी स्पष्ट केले.

युगांडा वरून आलेल्या ओमिक्रोन बाधितांचे हे दोघे आई वडील असून प्रशासनाने त्यांच्या ओमायक्रॉनच्या टेस्टसाठी नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. या दोघांच्या संपर्कात लोकांचा प्रशासनान युद्धपातळीवर शोध घेत आहे. युगांडाहून चौघे ज्यावेळी फलटणला आले, त्यावेळी त्यांचे आई वडील दुसरीकडे राहायला गेले होते. चौघे बाधित येऊन त्यांना उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आल्यावर त्यांचे आई वडील पुन्हा त्याठिकाणी राहायला आले होते. ते कसे पॉझीटीव्ह आले याबाबतचा तपास प्रशासन करत आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!