सुरुवातीच्या अस्थिरतेनंतर बाजार स्थिरावला, मात्र अद्याप गर्तेतून सावरला नाही


स्थैर्य, मुंबई, दि.१८: मागील आठवड्यात बाजारात सुरुवातीला दयनीय स्थिती दिसली. एसजीएक्स निफ्टीने दर्शवल्यानुसार, निफ्टी आश्चर्यकारकरित्या घसरणीवर म्हणजेच २०० पेक्षा जास्त अंकांनी कोसळून सुरु झाले. देशांतर्गत वाढलेल्या कोव्हिड-१९ रुग्णांच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर ही स्थिती दिसून आली. या प्रक्रियेत निफ्टीने सब-१४,३०० पातळीवरील कसोटी देत ५०० अंकांपेक्षा जास्त मोठी घसरण घेतली. पहिल्या दिवशी बाजार बंद होताना खूप चिंता होती. मात्र सुदैवाने ही स्थिती राहिली नाही. खरं तर, उर्वरीत आठवड्यात, नुकसान भरून काढण्यासाठी आपण बरीचशी सुधारणा करु शकलो.

एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे चीफ अॅनलिस्ट-टेक्निकल अँड डेरिव्हेटिव्हज श्री. समीत चव्हाण यांनी सांगितले की गेल्या आठवड्यातून काही सकारात्मक धडा घ्यायचा ठरवल्यास, तो म्हणजे, नफ्याच्या बाजूने भक्कमपणे झालेली सुधारणा. आयटी आणि फार्मासारख्या काही पॉकेट्सनीदेखील उर्वरीत निम्म्या काळात चांगली कामगिरी केली. एका मुद्द्याकडे आम्ही लक्ष वेधू इच्छितो की, निफ्टी मिडकॅप ५० इंडेक्सने ‘हेड अँड शोल्डर’ पॅटर्नच्या ब्रेकडाऊनसोबत दैनंदिन चार्टवर ‘लोअर टॉप आणि लोअर बॉटम’ सिक्वेन्सची पुष्टी केली आहे. म्हणूनच, योग्य थीम आणि त्यातील संभाव्य मूव्हर्स ओळखल्यास तो महत्त्वाचा पैलू सिद्ध होईल. आमच्या दृष्टीने, ठराविक महत्त्वाची पातळी पुन्हा गाठली जाणार नाही, तोपर्यंत पोझिशनवर लक्ष ठेवणे आणि आक्रमक लालसा टाळणे चांगले.

स्टॉकच्या शिफारशी:

  1. एनएसई स्क्रिप कोड- स्ट्राइड्स फार्मा: (स्थिती-तेजी ; शेवटची स्थिती- ९२२.१५ रुपये)

स्पष्टीकरण: गेल्या १२ महिन्यांपासून फार्मा क्षेत्र पूर्णपणे वेगळ्या कक्षेत आहे. मागील ५ वर्षांपासून त्यांची कामगिरी पाहता, कंटाळलेपणा झटकून या क्षेत्रातील जवळपास सर्वच कंपन्यांनी नुकसान भरपाई केली आहे. आता काही काळासाठी किंमत घसरल्यामुळे स्टॉक खरेदीची घाई आई दिसत आहे.  स्ट्राइड्स फार्माने मागील काही दिवसांच्या प्रवाहात भाग घेतला नाही. मात्र शुक्रवारी, या स्टॉकने निर्णायक किंमत दर्शवली आणि अलीकडील गर्दीच्या झोनमधून बाहेर पडत व्हॉल्यूम घसरला. आम्ही येत्या काही दिवसात 992 रुपयांच्या उद्दिष्टासाठी तो ९१२-९०७ पर्यंत जाईल, अशी शिफारस करतो. स्टॉप लॉस ८७२ रुपयांवर ठेवता येईल.

  1. एनएसई स्क्रिप कोड- ग्रासीम: (स्थिती-तेजी ; शेवटची स्थिती- १३५३. २० रुपये)

स्पष्टीकरण: मागील मार्च महिन्यातील घसरणीनंतर, मोठी झेप घेतल्याने, आम्ही हा काउंटर ‘विक्री’ किंवा ‘बिअरिश’ या संज्ञेसह वापरत नाहीत. किंमतीत थोडीही घसरण न घेता, तेव्हापासून स्टॉकच्या किंमतीने तीन पटींनी वाढ दर्शवली आहे. उच्चांकी ट्रेंड दिसत असला तरीही आम्हाला स्टॉकच्या किंमतीत थोडी घसरण होण्याचे संकेत मिळत आहेत. दैनंदिन चार्टवर, मागील काही महिन्यांत प्रथमच अल्पावधीतील सरासरी मंदीच्या क्रॉसओ‌व्हरसह तो ‘२०-ईएमए’ च्या खाली येत आहे. आम्ही १२७० रुपयांच्या टार्गेटच्या छोट्या बाऊंसवर विक्री करण्याची शिफारस करतो. स्टॉपलॉस १४०२ रुपयांवर लावता येईल.


Back to top button
Don`t copy text!