दैनिक स्थैर्य | दि. १७ जून २०२३ | फलटण | महाराष्ट्र राज्याला वारकरी संप्रदायामुळे समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला आहे. संतांनी आपल्या जनजागृती कार्याच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात आध्यात्मिक लोकशाही स्थापन केली आहे. आषाढी व वारीच्या निमित्ताने वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोप्यातून देहु, आळंदी, पंढरपूर येथे दाखल होत असतात. या वारकयांमध्धये सहभागी होणा-या महिलांची संख्या देखील लक्षणीय असते. महिनाभर या महिला वारीमध्ये चालत असताना अनेक महिलांना यामहिन्यातून एकदा तरी मासिक पाळीला सामोरे जावे लागते. विटाळ म्हणून दुर्लक्षित केलेली मासिक पाळी ही स्त्रीत्वाचा तो जन्म असतो. सृजनशीलतेची ती जाणीव असते. मात्र याविषयावर कोणी बोलायचे नाही अशी समाज मनाची भावना असते. स्वतः वारीत सहभागी होऊन महिलांच्या अडचणी जवळून पाहिल्या आणि आयोगाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्याची संधी मिळाली. हे करत असताना माझ्या वारकरी महिला बघिनीच्या चेहऱ्यावरील जो आनंद आहे; हेच माझ्या विठ्ठलाचे दर्शन असल्याचे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने आषाढी वारी कालावधीमध्ये वारकरी महिलांना सुरक्षा आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणारा आरोग्य वारी अभियानाचा फलटण येथे शुभारंभ राज्य महिला आयोगाचा अध्यक्षा सौ. रुपाली चाकणकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी सौ. चाकणकर बोलत होत्या. यावेळी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रांताधिकारी सचिन ढोले, प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, पोलीस उपअधीक्षक राहुल धस, तहसीलदार समीर यादव, तहसीलदर अभिजित पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
पुढे चाकणकर म्हणाला की, राज्यातील गृह खात्यातील यंत्रणा सक्षम करण्याची गरज आहे. अनेक महिला व मुली बेपत्ता असल्याचे पोलीस खात्यातील रेकॉर्ड त्यांनी बोलून दाखविले. यावेळी महिला व मुलींना नोकरीचे आमिष दाखवून बाहेर गावी नेऊन त्यांची फसवणूक केली जाते. याकरिता शासनाने महिलांच्या सुरक्षितेसाठी कठोर पावले उचलावे लागणार आहेत. वारीमध्ये अथवा इतर ठिकाणी सुद्धा कोणत्याही महिलेला कुठेही त्रास झाला; कोणताही नराधम हा महिलांना त्रास देत असेल तर त्यांनी तातडीने महिला हेल्प लाईन नंबर ११२ व १०९१ याद्वारे संपर्क साधावा; पुढच्या फक्त १० मिनिटांत आपले पोलीस बांधव त्या ठिकाणी मदतीसाठी येतील.
यावेळी बोलताना आमदार दीपक चव्हाण म्हणाले कि, गेल्या वर्षी पासून आरोग्य वारी हा उपक्रम राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून सौ. रुपालीताई चाकणकर ह्या राबवत आहेत. सौ. रुपाली चाकणकर ह्या महिला आयोगाच्या अध्यक्ष झाल्यानंतर राज्यामध्ये असणारा महिला आयोग हा एवढ्या ताकदीने काम करू शकतो; हे राज्यातील सर्वच नागरिकांना समजले आहे. या पूर्वी सुद्धा महिला आयोग हा राज्यामध्ये कार्यरत होता. परंतु नक्की महिला अयोग्य कोणत्या पद्धतीचे काम करत होता हे कोणालाही कळत नव्हते. महिला आयोग्याच्या माध्यमातून जो आरोग्य वारी उपक्रम हाती घेण्यात आला आहे; तो अतिशय स्तुत्य उपक्रम आहे.
कोरोना काळामध्ये फलटण तालुक्यातील आशा, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी जे काम केले आहे ते कधीही विसरणार नाही. कोरोना सारख्या परिस्थितीमध्ये या सर्व बघिनी ह्या प्रत्येक घरामध्ये जावून सर्वांची विचारपूस करत आपली सेवा बजावत होत्या. महिला अयोग्याच्या माध्यमातून जो आरोग्य वारी उपक्रम हाती घेण्यात आला आहे तो उपक्रम अतिशय स्तुत्य असून याचा फायदा नक्कीच वारीमधील महिला वारकरी बघिनींना होणार आहे. फलटणचे तसे मोठं भाग्य आहे कि; श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हा फलटणमधून पुढे पंढरपूरकडे मार्गस्थ होत असतो, असे मत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
या उपक्रमात सँनिटरी नॅपकिन वैंडिंग व सॅनिटरी नॅपकिन बर्निग मशीन, स्त्रीरोगतज्ञ, चेंजिंग रूम, सर्व दर्शनी भागात महिला सुरक्षा हेल्पलाइन क्रमांक, दर दहा किलोमीटर अंतरावर विसावा कक्ष, स्तनपान मातांसाठी हिरकणी कक्ष तसेच निर्भया पथक आदी सुविधा महिलांकरिता ठेवण्यात आलेल्या आहेत.