महिलेच्या पर्समधील दागिने बसमध्ये चढताना चोरट्यांने लांबवले


 

स्थैर्य, वाई, दि.१८: वाई बस स्थानकात बसमध्ये चढत असताना झालेल्या गर्दीत अज्ञात चोरट्यांनी आज दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास वृध्देच्या पर्समधून लांबवल्याची घटना घडली.दोन महिलांचे दागिने चोरीला गेल्याच्या घटना वाई बस स्थानकात घडल्या असून वाई पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे.

याबाबत वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सुशीला शंकर जाधव रा.व्याहळी पुर्नवसन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्या त्यांच्या बहिणीला दवाखान्यात दाखवून आणण्यासाठी वाईला दि.16रोजी 11 वाजता आल्या होत्या.दवाखान्यात दाखवून परत घरी जाण्यासाठी वाई स्टँडवर आल्या.दुपारी पावणे दोन वाजता सातारा वाई ही बस लागली त्यात त्या चढत असताना त्यांच्या हातात असलेल्या पर्समधील 38 हजार रुपयांची मोहन माळ अज्ञात चोरट्या महिलेने लांबवली.तसेच दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वाई आकोशी या बसमध्ये कमल तुकाराम राजपुरे(रा.तायघाट)यांच्या ही दागिन्यांची चोरी झाल्याचे त्यांना समजले.याची नोंद वाई पोलीस ठाण्यात झाली असून महिला पोलीस नाईक एस.एम.चव्हाण तपास करत आहेत.

वाई बसस्थानक येथून दुचाकी चोरीला


वाई बसस्थानक येथे भावाला सोडायला आलेला संदीप शंकर हाके(रा.बावधन)यांची स्प्लेंडर एमएच11सीएफ 5746 ही दि.14रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याचा वाई पोलीस ठाण्यात दाखल झाला असून हवालदार टी.के.पवार हे करत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!