
स्थैर्य, सातारा, दि.१८: येथील दुकानातील महिला कामगाराला तिच्याच महिला सहकार्याने मारहाण केली. मित्राबरोबर फिरायला बाहेर गेल्याचे दुकानातील स्टाफला सांगितल्याचा जाब विचारला म्हणून मारहाण केल्याप्रकरणी रुबीना अमीर शेख वय 31 रा. बुधवार पेठ, सातारा हिच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार व संशयित एकमेकींच्या तोंडओळखीच्या असून त्या सातारा येथील लाहोटी कलेक्शनमध्ये कामाला आहेत. तक्रारदार युवती मित्रासमवेत फिरायला गेली होती. ही गोष्ट रुबीना शेख हिने दुकानाच्या स्टाफमधील वैशाली जाधव यांना सांगितली. याचा जाब तक्रारदार युवतीने विचारला. त्याचा राग येवून रुबीनाने तक्रारदार युवतीला शिवीगाळ व दमदाटी करून हाताने मारहाण केली. याप्रकरणी सपोनि शितोळे तपास करत आहेत.