सरकार नवीन कर प्रणालीला आकर्षक बनवणार, PF आणि LTC वर मिळू शकते सवलत


स्थैर्य, नवी दिल्ली, दि.३०: केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारमण मागच्या वर्षी नवीन टॅक्स व्यवस्था घेऊन आल्या होत्या. पण, खूप कमी लोकांनी या पर्यायाची निवड केली. कारण यात NPS मध्ये 50,000 रुपयांपेक्षा दुसरी कोणतीच सुट नाही. यंदा नवीन टॅक्स व्यवस्थेला जास्त आकर्षक बनवण्यासाठी नियमांमध्ये काही बदल केले जाऊ शकतात. नागरिकांना दिलासा देण्यासाठी यात प्रोविडेंट फंड (PF) आणि लीव्ह ट्रॅव्हल कन्सेशन (LTC)वर टॅक्स सुट दिली जाऊ शकते.

डोनेशनवर नवीन टॅक्स व्यवस्थेत मिळू शकते सुट

बजेटमध्ये डोनेशन देणाऱ्यांना डिडक्शन (कपात)चा फायदा मिळू शकतो. इनकम टॅक्सची कलम 80G अंतर्गत कोणताही व्यक्ती, संयुक्त हिंदू कुटुंब (एचयूएफ) किंवा कंपनी, एखादा फंड किंवा चॅरिटेबल संस्थेला दिलेल्या दानावर टॅक्स सुटचा फायदा मिळवू शकतो. यात एकच अटक आहे, की ज्या संस्थेला तुम्ही दान देत आहात, ती सरकारकडे रजिस्टर असायला हवी. दान चेक, ड्राफ्ट किंवा कॅशमध्ये दिला जाऊ शकतो. पण, कॅशमध्ये दिलेल्या दानावर 2000 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम असल्यास, टॅक्स कपातीचा फायदा मिळणार नाही.

मागच्या वर्षी सादर केली होती नवीन कर प्रणाली

मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये नवीन आयकर प्रणाली सादर करण्यात आली होती. यात सात टॅक्स स्लॅब बनवले होते. – 0%, 5%, 10%, 15%, 20%, 25% आणि 30%. जुन्या कर प्रणालीत चार टॅक्स स्लॅब होते- 0%, 5%, 20% आणि 30%. नवीन कर प्रणालीत 5 लाख ते 15 लाख रुपयांमधील आयकरावर टॅक्स कमी आहे, पण यात सुट मिळत नाही.


Back to top button
Don`t copy text!