हर्षदाच्या ‘सुवर्ण’ कामगिरीचा देशाला अभिमान – उपमुख्यमंत्री अजित पवार

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि.०३ मे २०२२ । मुंबई । जागतिक ज्युनिअर वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या पुण्याच्या हर्षदा गरुड हिचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात, हर्षदाच्या सुवर्ण कामगिरीचा संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे. ग्रीस-हेरकिलॉन येथे झालेल्या जागतिक ज्युनिअर वेटलिफ्टिंग स्पर्धेत हर्षदाने देशासाठी पाहिले सुवर्णपदक जिंकले आहे. पुणे जिल्ह्यातील मावळमधील हर्षदाने देशाच्या शिरपेचात मनाचा तुरा खोवला असून तिच्या या कामगिरीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हर्षदाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Back to top button
Don`t copy text!