पुण्याहून साताऱ्याकडे जाणारा कंटेनर आडवा झाल्याने खंबाटकी घाटात तीन तास कोंडी


 

स्थैर्य, खंडाळा, दि.७: पुण्याहून साताऱ्याकडे जाणाऱ्या खांबाटकी घाटात ब्रेक फेल झाल्यामुळे कंटेनर उताराने पाठीमागे येत घाटरस्त्यात आडवा झाला. त्यावेळी घाटमार्गावरून जाणाऱ्या दुसऱ्या कंटेनरला धडकल्याने तो रस्त्याच्या बाजूला पडला. त्यामुळे रविवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून तीन तास पुण्याहून सातारा बाजूकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. 

बोगद्यामार्गे ही वाहतूक वळवण्यात आल्याने दोन्ही बाजूकडील वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. खंडाळा व महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त कंटेनर रस्त्यातून बाजूला केला. काही काळ सातारा बाजूकडे जाणारी वाहतूक बोगदामार्गे वळवण्यात आली. त्यामुळे महामार्गावर वेळे (ता. वाई) येथे वाहतुकीची कोंडी झाली होती. सुमारे तीन तास वाहतूक विस्कळीत झाली होती. खंडाळा पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक स्वाती पवार, हवालदार गिरीश भोईटे, विठ्ठल पवार, धुमाळ, यादव, भोसले, गायकवाड आदी पोलिस कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!