
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. २६ ऑगस्ट २०२२ । फलटण । शेरे, तालुका कराड गावच्या हद्दीत कृष्णा नदीपात्रात एका बेवारस महिलेचा मृतदेह आढळून आल्याची नोंद कराड तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 24 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शेरे तालुका कराड गावच्या हद्दीत स्मशानभूमी जवळ कृष्णा नदीच्या पात्रात एका तीस ते पस्तीस वयाच्या महिलेचा बेवारस मृतदेह आढळून आला आहे. याबाबतची खबर मिलिंद हिंदुराव पाटील वय 51 यांनी कराड तालुका पोलीस ठाण्यात दिली असून पोलीस हवालदार पहिले अधिक तपास करीत आहेत.
