वेधिक अ‍ॅकॅडमीमधून उत्तमोत्तम प्रशासकीय अधिकारी घडावेत : आ.दीपक चव्हाण


स्थैर्य ,फलटण, दि, ०२: वेधिक अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुला-मुलींसाठी प्रशासकीय सेवेत जाण्यासाठीच्या तयारीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. अ‍ॅकॅडमीच्या व्यवस्थापनाने आपल्या कौशल्याच्या जोरावर उत्तमोत्तम प्रशशसकीय अधिकारी घडावेत यासाठी सदैव प्रयत्नशील रहावे. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व सचिव हे उत्तम प्रशासकीय अधिकारी होते. त्यामुळे फलटण तालुक्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या संस्थेच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन फलटण – कोरेगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक चव्हाण यांनी केले.

काळज, ता.फलटण येथे वेधिक आय.ए.एस.अ‍ॅकॅडमीचे उद्घाटन आमदार चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास संस्थेचे रिजनल मॅनेजर डॉ.सोलोमन, डॉ.लीना, सेंटर डायरेक्टर प्रीती पायमपल्ली, अ‍ॅलेक्स पायमपल्ली, काळजचे सरपंच संजय गाढवे, पोलीस पाटील प्रदीप गाढवे, केंद्र संचालक सुहास मोहिते, सहाय्यक केंद्र संचालक मिलिंद भिसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ.सोलोमन यांनी अ‍ॅकॅडमीच्या कार्याबाबत व देशभरातील विविध ठिकाणच्या शाखांबाबत सविस्तर माहिती देवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अ‍ॅकॅडमीशी संलग्न होवून प्रशासकीय सेवेत रुजू व्हावे, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बागर यांनी केले तर आभार मिलींद भिसे यांनी मानले. कार्यक्रमास काळज येथील संतोष जगताप, नारायण घाडगे, रामभाऊ डोंबाळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!