
दैनिक स्थैर्य । दि. ०३ जानेवारी २०२३ । फलटण । येथील सरस्वती शिक्षण संस्था संचलित, प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा (Annual Cultural Fiesta :2022-23) वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.यावेळी इ. Nusery ते इ .१२ वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता.प्रथम विद्यार्थ्यांनी श्री गणेश वंदन सादर केले.पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी ख्रिसमस साँग,वो कृष्णा है ,जंगल जंगल पता चला है,Cutest Baby यासह इंग्लिश गाण्यांवर अतिशय सुंदरपणे नृत्यांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेची परंपरा जोपासत कोळीगीत,वाघ्या – मुरळी लाईव्ह परफॉर्मन्स,गोंधळी गीत, आदिवासी नृत्य या बरोबरच ऑल इज वेल, सिंम्बा,हिंदी – मराठी रिमिक्स, गल्ला गुरिया व बरसो रे मेघा अशा हिंदी गाण्यांवर आकर्षकपणे नृत्य सादरीकरण करून उत्कृष्ट अभिनयाची चुणूक दाखवली.यास उपस्थितांनी टाळ्या वाजवून प्रचंड प्रतिसाद दिला व त्यानंतर अनाथ मुलांच्या जीवनावर एक हृदयस्पर्शी नाटिका सादर करून पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांना आदरांजली वाहिली. देशभक्तीपर गाण्याद्वारे भारताच्या तिन्ही दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांना श्रद्धांजली अर्पण केली.यावेळी उपस्थितांची मने हेलावली.माध्यमिक व उच्च माध्य. विभागातील विद्यार्थ्यांनी नाचो – नाचो,ढोलिडा,बाबा साँग, महाराष्ट्राची अस्सल मराठमोळी लावणी(चंद्रा) या गाण्यांवर सुंदर नृत्याविष्कार सादर करून प्रेक्षकांची मने खिळवून ठेवली. तसेच हसना मना है या विनोदी नाटकाने प्रेक्षकांना खूप हसवले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी छ.शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आग्र्याहून सुटका या चित्तथरारक प्रसंगाचे अतिशय उत्तम सादरीकरण केले. त्यानंतर विश्व एकात्मता या नाटिकेद्वारे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जगाच्या कल्याणासाठी विश्वशांतीचा संदेश दिला.यावेळी वातावरण भावमय व चैतन्यपूर्ण होते.त्यानंतर विद्यार्थ्यांनिंनी गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (दिदी) यांनी गायलेल्या विविध प्रकारच्या हिंदी गाण्यांवर मनमोहक व उत्कृष्ट नृत्याविष्कार सादर करून लता दिदींना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. याचे प्रेक्षकांनी प्रचंड कौतुक केले.
तत्पुर्वी स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली.त्यानंतर प्रमुख पाहुणे व विविध क्षेत्रातील उपस्थित मान्यवरांचे शाल,बुके व रोप देऊन स्वागत करण्यात आले.त्यानंतर प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमास मा.श्री.शिवाजीराव जगताप (प्रांत अधिकारी फलटण)हे प्रमुख पाहुणे म्हणून तर मा.श्री.तानाजी बरडे (पोलीस उपविभागीय अधिकारी), मा.श्री.विशाल कुदळे(लघुचित्रपट दिग्दर्शक व निर्माते)मा.श्री.धनंजय पवार(चेअरमन,फलटण ता. दुध संघ); मा.श्री.अरविंद मेहता (ज्येष्ठ पत्रकार)मा.श्री.रमेश आढाव (ज्येष्ठ पत्रकार), मा.श्री भीमराव माने(संस्थापक , सरस्वती शिक्षण संस्था )मा.श्री.पांडुरंग पवार भाऊ व मा.सौ.सुलोचना पवार, मा.श्री.विशाल पवार (सचिव,सरस्वती शिक्षण संस्था),मा.श्री.विकास गायकवाड(गामविकास अधिकारी), सौ.संध्या गायकवाड(व्यवस्थापकीय संचालिका, सरस्वती शिक्षण संस्था) सौ.प्रियांका पवार (सरस्वती शिक्षण संस्था संचलिका),विद्यमान सरपंच,उपसपंच व ग्रामपंचायत सदस्य, कोळकी,पत्रकार बंधू यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करून प्रोत्साहन दिले.
याप्रसंगी शिक्षणाबरोबरच क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो,असे मत प्रांत अधिकारी श्री.शिवाजीराव जगताप यांनी व्यक्त करून प्रशालेची गुणवत्ता कौतुकास्पद असल्याचे सांगितले व शाळेच्या पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी श्री.अरविंद मेहता यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य श्री.अमित सस्ते यांनी शाळेच्या शैक्षणिक उपक्रमाबाबत व विद्यार्थ्यांच्या विविध क्षेत्रातील प्रगतीबाबत सविस्तर माहिती सांगितली.तसेच यामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबर सर्वांगीण विकासावर वैयक्तिक लक्ष केंद्रित करण्यासाठी सर्व शिक्षक नेहमीच प्रयत्नशील असल्याचे नमूद केले.
या वार्षिक स्नेहसंमेलनाची विशेष व प्रशंसनिय बाब म्हणजे प्रशालेच्या नर्सरीतील लहान विद्यार्थ्यांसह मोठ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या विविध गाण्यांपूर्वी इंग्रजी,हिंदी व मराठी भाषांमध्ये अतिशय प्रभावी देहबोलीद्वारे, हावभावयुक्तपणे ,अस्खलित व समर्पक शब्दांत सादर केलेले सुत्रसंचालन होय.यासाठी संबंधित वर्गशिक्षिकांनी विशेष मार्गदर्शन करून प्रचंड कष्ट घेतले.याचे उपस्थित मान्यवरांनी व पालकांनी तोंड भरून कौतुक केले.
हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सौ.संध्या गायकवाड(व्यवस्थापकीय संचालिका) व श्री.विशाल पवार (सचिव)यांच्या बहुमोल मार्गदर्शनानुसार प्रशालेचे प्राचार्य,श्री. अमित सस्ते,सौ.माधुरी माने (पर्यवेक्षिका),सौ.सुवर्णा निकम(समन्वयिका ,प्राथ.विभाग) , श्रीमती.योगिता सस्ते((समन्वयिका ,माध्य.विभाग यांच्यासह नृत्य प्रशिक्षक श्री.प्रशांत भोसले आणि शाळेतील सर्व शिक्षकवृंदांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन करून शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसह अथक परिश्रम घेतले.सर्व पालकांचेही सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.अमृता गोसावी व सौ.रेश्मा कदम यांनी अतिशय प्रभावीपणे केले, तर सौ.क्षितिजा पंडित यांनी समर्पक शब्दांत आभार मानले.