महावितरण चा वर्धापन दिन उत्साहात संपन्न


दैनिक स्थैर्य । दि. ०८ जून २०२३ । बारामती । मंगळवार ६ जून 2023 रोजी बारामती ग्रामीण परिमंडळ मंडळा तर्फे महावितरण कंपनीचा अठरावा वर्धापन दिन विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी बारामती  परिमंडळ  मुख्य अभियंता सुनीलजी पावडे अध्यक्षते खाली संपन्न झाला.
श्री  लटपटे प्रभारी अधीक्षक अभियंता , पायाभूत आराखडा प्रभारी अधीक्षक अभियंता  प्रकाश देवकाते ,सासवड विभागाचे कार्यकारी अभियंता  श्री वनमोरे ,केडगाव विभागाचे कार्यकारी अभियंता  श्री एडके , कार्यकारी अभियंता श्री  मिसाळ ,श्री रागीट , सहाय्यक महाव्यवस्थापक सूर्यवंशी , श्री  वेळापुरे ,वरिष्ठ व्यवस्थापक जाधव.उप औद्योगिक संबंध अधिकारी श्री वायदंडे , बारामती ग्रामीण मंडळाचे प्रभारी व्यवस्थापक श्री चौधरी व सर्व संघटना प्रतिनिधी  आदी मान्यवर उपस्तीत होते.
महावितरण चे  कर्मचारी व त्यांच्या कुटुंबासाठी “ये शाम मस्तानी “सांस्कृतिक कार्यक्रम,संपन्न झाला तर कर्मचाऱ्यांच्या लहान मुलांसाठी फणी गेम्स व जादूचे प्रयोग ,विद्युत रोषणाई,रांगोळी व फोटो काढण्यासाठी सेल्फी पॉईंट आदी ची व्यवस्था करण्यात आली होती
ग्राहकांना उत्तम गुणवत्ता व दर्जा आणि सेवा देत असताना कर्मचारी व त्यांच्या कुटूंबियाचे योगदान म्हतपूर्ण असल्याचे बारामती  परिमंडळ  मुख्य अभियंता सुनीलजी पावडे  यांनी सांगितले.

Back to top button
Don`t copy text!