मलठण येथे आजपासून टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ६ डिसेंबर २०२३ | फलटण |
फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक अशोकराव जाधव (काका) यांच्या वाढदिवसानिमित्त फलटण तालुका मर्यादित भव्य फुलपिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचे दि. ०६ डिसेंबर ते ०८ डिसेंबर २०२३ या कालावधीत कै. लोकनेते हिंदूरावजी ना. निंबाळकर क्रीडा संकुल, मलठण व श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल समोर, मलठण या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धांमधील विजेत्यांना प्रथम क्रमांकास ३१ हजार रूपये (चि. विहान भोसले पाटील यांच्यातर्फे), द्वितीय क्रमांकास २१ हजार रूपये (श्री. अनिल रणवरे व श्री. माऊली शिंदे), तृतीय क्रमांकास ११ हजार रूपये (श्री. सत्यशील उर्फ बंडू नाळे व श्री. जयवंत शिंदे) व चतुर्थ क्रमांकास ७ हजार रुपये ( श्री. अमोल घाडगे यांच्याकडून) देण्यात येणार आहेत.

नियम व अटींनुसार खेळविल्या जाणार्‍या या स्पर्धांची प्रवेश फी २०००/- रूपये असून मॅन ऑफ द मॅच चषक, मॅन ऑफ द सीरिज सायकल, बेस्ट बॉलर चषक, सलग तीन विकेट चषक, सलग सहा षटकार १००० रूपये, सलग सहा चौाकर ११११/- रूपये अशी बक्षिसेही देण्यात येणार आहेत.

या स्पर्धेचे संयोजक अभिनव महाराष्ट्र मित्रमंडळ, जिजाई चौक व शिवतेज क्रिकेट लब, मलठण हे आहेत.

अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी संग्राम सावंत (९३२५३८०७८०), रवी माने (८७८८७२७३२४), माऊली शिंदे (९१५८७३३७४४), कैलास पवार (९६०४०४३६६१) व गुगल पे/फोन पे साठी संग्राम सावंत – ७३५०२१२०२१ येथे संपर्क साधावा.


Back to top button
Don`t copy text!