
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. 06 डिसेंबर 2023 | फलटण | विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करत आदरांजली अर्पण केली.
‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा संदेश देत त्यांनी समाजात दुय्यम स्थान असलेल्या लोकांना प्रेरणा दिली. शिक्षणाच्या माध्यमातून राजकीय, सामाजिक कार्यासाठी पुढाकार घेऊन मानवाधिकारांच्या रक्षणासाठी संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या बाबासाहेबांचे विचार कृतीतून पुढे न्यावेत हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल; असे मत श्रीमंत रामराजे यांनी व्यक्त केले.
