अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करा; हॉटेल चालकांची फलटण पोलिसांकडे मागणी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

स्थैर्य, फलटण, दि.०६: फलटणमधील कोणत्याही हॉटेल चालकावर कुत्र्याचे मांस विकल्या प्रकरणी कारवाई झाली नसून, असा प्रकार घडला असल्याची अफवा समाजमाध्यमामध्ये पसरवणाऱ्यांविरोधात पोलीस कारवाई व्हावी, अशी मागणी हॉटेल असोसिएशनच्यावतीने करण्यात आली आहे.

कोळकी येथील हॉटेल चालक पार्सल सुविधेच्या नावाखाली कुत्रे कापून विकत असून त्याच्यावर पोलीस कारवाई झाली आहे, अशा आशयाची पोस्ट व्हाट्सअपवर फिरत होती. मात्र, असा कोणताही प्रकार घडला नसून विकृत प्रवृत्तीचे लोक अशी अफवा पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या लोकांवर कारवाई व्हावी, अशी मागणी फलटण हॉटेल असोसिएशनने फलटण पोलिसांकडे केली आहे.

Back to top button
Don`t copy text!