रणसिंगवाडी येथील कुख्यात गुंड तडीपार

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि.३१ डिसेंबर २०२१ । पुसेगाव । पुसेगाव पोलीस ठाणें हद्दीतील कुख्यात गुंड दत्तात्रय दादासो मसुगडे वय 22 वर्षे रा रणशिंगवाडी ता खटाव याला पुढील एक वर्षाकरता तडीपार करण्यात आले असल्याची माहिती सपोनी संदीप शितोळे यांनी दिली.

कुख्यात गुंड दत्तात्रय मसुगडे याच्या विरुद्ध दहिवडी व पुसेगाव पोलीस ठाणेत दरोडा ,जबरी चोरी ,खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत. पुसेगाव पोलीस ठाण्यात त्याच्यावर भादवीस कलम 394 ,34 प्रमाणे दाखल गुन्हा बद्दल शिक्षा झाली होती. व तो तुरुंगात होता.नजीकच्या काळात जामिनावर सुटून येताच पुसेगाव पोलिस ठाण्याचे सपोनि संदीप शितोळे यांनी पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार तडीपारीच्या आदेशाची अंमलबजावणी करुन मसुगडे याला माण, खटाव,कोरेगाव ,फलटण या चार तालुक्यातून एक वर्षासाठी तडीपार केले आहे.या कारवाई चे सर्वच स्तरांतून समाधान व्यक्त होत आहे.जबरी चोरी,दरोडा सारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर अशी कारवाई सुरू असल्याची माहिती शितोळे यांनी दिली.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!