
थेट WhatsApp वर मिळवा
पुण्यात आदित्य कुलकर्णी यांच्या काही अनुभवाचे कवडसे काव्यसंग्रहाचे प्रकाशन होऊन ऑस्ट्रेलियातील भारतीय वाचकांसाठीचा प्रवास सुरू झाला आहे.
स्थैर्य, पुणे, दि. 26 नोव्हेंबर : आदित्य कुलकर्णी लिखित काही अनुभवाचे कवडसे या काव्यसंग्रहाचे प्रकाशन रविवार, दि. 22 नोव्हेंबर 2026 रोजी सायंकाळी 5 ते 8 या वेळेत पत्रकार संघ, पुणे येथे झाले. या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन श्रीमंत पब्लिकेशन, पुणे यांनी केले होते.
प्रमुख पाहुण्यांचे मनोगत व सत्कार
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार संतोष खेडलेकर उपस्थित होते. संतोष खेडलेकर यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन करण्यात आले आणि त्यांनी आदित्य कुलकर्णी यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. संतोष खेडलेकर हे ज्येष्ठ पत्रकार असून पत्रकारिता हा विषय शिकवतात. त्यांनी आपल्या भाषणातून नवोदित कवी आदित्य कुलकर्णी यांना नवी दिशा दाखविली व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
ऑस्ट्रेलियातील वाचकांसाठी प्रवास
पुस्तक प्रकाशनानंतर या पुस्तकाचा प्रवास ऑस्ट्रेलियातील भारतीय वाचकांसाठी भारत ते ऑस्ट्रेलिया असा सुरू झाला. हे काम श्रीमंत पब्लिकेशनचे वल्लभ गदादे यांनी केले.
मान्यवरांची उपस्थिती व मार्गदर्शन
या कार्यक्रमास नाशिक, पुणे, मुंबई, नगर, सातारा, फलटण, कराड येथून अनेक मान्यवर, डॉक्टर, प्राध्यापक व साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात प्रजापिता ब्रह्माकुमारी सेंटर, शेवगावचे ब्रह्मकुमार दीपकभाई कुलकर्णी, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त अशोकराव आवलगावकर, भालचंद्र कुलकर्णी, स नबिम शिक्षण संस्थेचे प्रशांत लाड आणि आयोजक वल्लभ गदादे यांचे मार्गदर्शन लाभले.



