फलटणचे तनमन बर्डे यांची कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान भेट

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

फलटणचे युवा संसद सदस्य तनमन बर्डे यांनी भोपाळ येथे केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांची सदिच्छा भेट घेतली.

स्थैर्य, भोपाळ, दि. 26 नोव्हेंबर : भारतातील विविध राज्यांतील युवा संसदपटूंसमवेत फलटणचे युवा संसद सदस्य तनमन राजेंद्र बर्डे यांनी भारत सरकारचे केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांची भोपाळ येथील शासकीय निवासस्थानी ‘मामा का घर’ येथे सदिच्छा भेट घेतली.

संवाद आणि मार्गदर्शन

यावेळी तनमन बर्डे यांनी युवा संसद सदस्य म्हणून आपल्या भविष्यातील वाटचालीविषयी शिवराज सिंह चौहान यांच्याशी संवाद साधला. सार्वजनिक जीवन, युवा नेतृत्व तसेच सामाजिक व संसदीय क्षेत्रातील भविष्यातील कार्यासंदर्भात त्यांनी मार्गदर्शन घेतले.

शुभेच्छा आणि प्रेरणादायी भेट

याप्रसंगी शिवराज सिंह चौहान यांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवातून मार्गदर्शन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. देशातील युवा संसदपटूंसोबत झालेली ही भेट तनमन बर्डे यांच्यासाठी प्रेरणादायी व संस्मरणीय ठरली.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!