स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

यंत्रणांनी वाढीव उपचार सुविधांसह सज्ज रहावे – पालकमंत्री सुभाष देसाई

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
March 19, 2021
in प्रादेशिक

स्थैर्य, औरंगाबाद, दि.१९: राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट तीव्र होत असून जिल्ह्यात वाढीव रूग्ण संख्येच्या प्रमाणात सर्व यंत्रणांनी अत्यावश्यक उपचार सुविधांसह सज्ज रहावे. समन्वय आणि सतर्कतापूर्ण प्रतिबंधात्मक उपाययोजनांव्दारे संसर्गापासून जिल्ह्याचे संरक्षण करावे, असे निर्देश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे दिले.

जिल्ह्यातील कोरोना संसर्ग व प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या संदर्भात व्हिडिओ कॉन्फरंसव्दारे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सर्व यंत्रणांचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त निखील गुप्ता, मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) मोक्षदा पाटील, सर्व यंत्रणा प्रमुख, वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती होती.

श्री. देसाई यांनी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेऊन वाढीव रूग्णसंख्येच्या प्रमाणात कोविड केअर सेंटर व सर्व रूग्णालयांमध्ये अतिरिक्त खाटांची उपलब्धता ठेवण्याच्या दृष्टीने यंत्रणांव्दारे करण्यात येत असलेल्या प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त करून घाटीतील गंभीर रूग्णांचा मृत्यूदर कमी करण्याच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेण्याचे सूचित केले.

तसेच गेल्या वर्षभरापासून यशस्वीपणे आपण या संसर्गाचा सामना करत असलो तरी जोपर्यंत जनता सक्रियपणे शासन प्रशासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करणार नाही तोपर्यंत आपण हा वाढता संसर्ग रोखू शकणार नाहीत, याचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व नागरिकांनी कोविड नियमावलीचे अधिक कटाक्षाने पालन करणे गरजेचे असल्याचे सांगून आता ‘नो मास्क नो लाईफ’ अशा स्थितीपर्यंत परिस्थिती आलेली आहे. त्यामुळे मास्क वापरासह कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन जनतेने केले पाहिजे. यंत्रणांनी संसर्गाला आळा घालण्यासाठी रात्रीची संचारबंदी, 4 एप्रिलपर्यंत अंशत: लॉकडाऊन या प्रतिबंधात्मक कार्यवाहीसोबत जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात ऑक्सीजन साठा, वाढीव खाटा, औषधांची उपलब्धता या बाबी कटाक्षाने सुव्यवस्थित ठेवाव्यात. कुठल्याही परिस्थितीत प्रत्येक रूगणाला व्यवस्थीत उपचार मिळाले पाहिजेत यादृष्टीने सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयातून प्रभावीरित्या नियोजन ठेवावे. मोठ्या प्रमाणात ट्रेसिंग आणि चाचण्यांचे प्रमाण वाढवत असताना कोरोना लसीकरण मोहीमही व्यापक प्रमाणात राबवावी. याबाबत आपल्या स्तरावरून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना जनजागृतीबाबत आवाहन करणार असल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले. तसेच प्रशासनाने ट्रेकिंग, टेस्टिंग तसेच ट्रिटमेंटवर भर द्यावा, असे सूचित करून जिल्ह्यात ऑक्सीजन, वाढीव प्रमाणात खाटांची उपलब्धता करण्यासाठीचे सर्व यंत्रणांचे नियोजन तसेच रेमडेसीविरची पूरेशी उपलब्धता, चाचण्यांचे वाढीव प्रमाण या बाबी संसर्गात दिलासा देणाऱ्या असून अतिरिक्त व्हेंटीलेटरची जिल्ह्यात उपलब्धता करून देण्यासाठी पाठपुरवा सुरू असून लवकरच ते उपलब्ध होती असे श्री. देसाई यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात वाढीव कोरोना रुग्णसंख्येच्या प्रमाणात प्रशासन सर्वतोपरी सर्व यंत्रणांच्या मदतीने सज्ज असल्याचे सांगून शहरासह ग्रामीण भागातही चाचण्यांचे प्रमाण वाढवले असून ग्रामीण रूग्णांवर त्याच ठिकाणी उपचार करण्याच्या दृष्टीने उपचार सुविधांमध्ये वाढ करण्यात येत आहे. लक्षणे नसलेल्यांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येत असून जिल्ह्यात एकुण 115 उपचार सुविधा उपलब्ध असून 11763 आयसोलेशन बेड, 2124 ओटु बेड तर 532 आयसीयु बेड, तसेच 300 व्हेंटीलेटर असल्याचे सांगितले. तसेच जिल्ह्यात आवश्यक प्रमाणात ऑक्सिजनचा साठा उपलब्ध ठेवण्याच्या दृष्टीने काळजी घेतली जात आहे. लसीकरणासाठी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रूग्णालयात तर शहरात 33 ठिकाणी लसीकरणाची सोय केली  आहे. तसेच मोबाईल व्हॅनद्वारेदेखील लसिकरणाची सुविधा तयार असल्याचे सांगितले.

पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यावेळी म्हणाले, शहरात 10 मार्चपासून मार्शल लॉकडाऊनचा आदेश काढला आहे. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आली. आजपासून रात्री आठ पासून ते सकाळी पाच वाजेपर्यंत संचारबंदी लागु करण्यात येणार आहे. गरजु लोकांना मास्क वाटप सुरू आहे. कठोर उपाययोजना केल्यास रुग्णांची संख्या कमी होण्यास मदत होईल, असे श्री. गुप्ता म्हणाले.

महापालिका आयुक्त अस्तिक कुमार पाण्डेय यांनी केंद्राच्या सूचनेप्रमाणे चाचण्यांवर अधिक भर देण्यात येत असल्याचे सांगून चाचण्यासाठी मोबाईल पथके तयार केली आहेत. चाचणीसाठी एकूण 54 पथके तैनात करण्यात आली आहेत. 20 पेक्षा अधिक रुग्ण वाढत आहेत, त्या ठिकाणांना कंटेनमेंट झोन घोषित करण्यात येईल. लसीकरणावर अधिक भर दिला जात आहे. प्रत्येक दिवशी दहा हजार रुग्णांवर उपचार करण्याची सोय उपलब्ध करून दिली जात असल्याचे श्री. पाण्डेय यांनी सांगितले.

डॉ. गोंदावले यांनी ग्रामीण भागातील रूग्णांना त्याचठिकाणी उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने उपजिल्हा रूग्णालयांमध्ये अत्यावश्यक सुविधांसह पुरेशी व्यवस्था करण्यात येत आहे. ग्रामीण भागात 8 हजार खाटा उपलब्ध करण्याचे नियोजन असून चाचण्यांची  क्षमता हजारापर्यंत करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. तसेच ज्या गावांमध्ये 25 पेक्षा जास्त रूगणसंख्या आहे त्या ठिकाणी कन्टेनमेंट झोन तयार करून मोबाईल व्हॅनव्दारा संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या मोठ्या प्रमाणात करण्यात येत असल्याचे सांगितले.

पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी  गेल्या वर्षाप्रमाणे व्युहरचना आखुन तालुका नाकाबंदी करण्यात येत आहे. तसेच नियमांचे पालन न करणाऱ्यांवर  दंडात्मक कारवाई, मास्क सॅनिटायझरचे वाटप पोलीसांमार्फत, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने सुरू असून जनतेला आवाहन करण्यासाठी पोलीसांसोबत स्थानिक यंत्रणा अधिकारऱ्यांनीही रस्त्यावर येऊन जनजागृती करण्याबाबत यंत्रणांना सांगितल्याचे त्या म्हणाल्या.


📣 दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. दैनिक स्थैर्यच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करावे.

ADVERTISEMENT
Previous Post

अण्णा भाऊ साठे महामंडळासाठी 500 कोटींची तरतूद करा भाजपा नेते अमित गोरखे यांची मागणी

Next Post

खासगी कार्यालये, आस्थापनांमध्ये ५० टक्के कर्मचारी उपस्थितीचे आदेश

Next Post

खासगी कार्यालये, आस्थापनांमध्ये ५० टक्के कर्मचारी उपस्थितीचे आदेश

ताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा

Join 1,024 other subscribers

जाहिराती

ताज्या बातम्या

रुग्णांच्या औषधोपचारासाठी योग्य ते नियोजन करा, प्रशासन अलर्ट करा – पालकमंत्री बाळासाहेब पाटील

April 12, 2021

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली गुंफणार हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे रौप्य पुष्प

April 12, 2021

उत्तमरांव आढाव यांचे दुःखद निधन

April 12, 2021

आढाव कुटुंबातील तेजस्वी तारा निखळला!

April 12, 2021

राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतरच्या काळात ऑक्सिजन उपलब्धता, वैद्यकीय सुविधा तातडीने वाढविण्यावर कार्यवाही करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

April 12, 2021

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या निर्णयांची जिल्ह्यात कठोर अंमलबजावणी होणार – पालकमंत्री जयंत पाटील

April 11, 2021

कोरोनावर नियंत्रणासाठी शासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक : केंद्रीय पथकाचे मत

April 11, 2021

महात्मा फुले हे क्रांतिकारक कार्यातून जनमानसाच्या आयुष्यात आनंद निर्माण करणारे महामानव – प्रसिध्द वक्ते व इतिहास संशोधक डॉ. श्रीमंत कोकाटे

April 11, 2021

फिनटेकचे नूतनाविष्कार आणि भांडवली बाजारावर त्याचा परिणाम

April 11, 2021

Phaltan, Satara : गुढीपाडव्याला आपली आवडती सुझुकी टूव्हीलर आणा घरी ऑफरच्या संगे

April 11, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.