दुष्काळी माण तालुक्यात चिंचेमुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात गोडवा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, कुकुडवाड, दि.२५: माण तालुक्‍यात परतीचा पाऊस दमदार झाल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. दमदार पावसामुळे चिंचेच्या झाडाला मोठ्या प्रमाणावर चिंचा लगडलेल्या आहेत. यातून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न निघणार असून, आंबट चिंचेमुळे शेतकऱ्यांच्या आयुष्याला गोडवा येणार आहे.

सातारा, सांगली, तसेच स्थानिक बाजारपेठ म्हसवड येथेही या भागातील चिंचेला मोठी मागणी असते. या भागातील व्यापारी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन चिंचेची खरेदी करतात. गेल्या वर्षीही तालुक्‍यात चांगला पाऊस झाला होता. यावर्षीही दमदार परतीचा पाऊस बरसल्यामुळे चिंचेची झाडे बहरली असून, मोठ्या प्रमाणावर चिंचेच्या झाडांना फळधारणा झाली आहे. यामुळे अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते, अशा शेतकऱ्यांना चिंचेच्या माध्यमातून दिलासा मिळणार आहे. एवढेच नाही तर चिंचेच्या माध्यमातून काढणी, झोडपणी व फोडणे यातून अनेक महिला, पुरुषांना रोजगार मिळणार आहे.

उपजीविकेसाठी कामगारांच्या पावलांना लाभला सायकलींचा आधार!

माण तालुक्‍यातील कुकुडवाड, विरळी, पानवन, वळई, जांभुळणी, शेनवडी, वरकुटे- मलवडी या गावांतून मोठे चिंचेचे वृक्ष आहेत, तसेच अनेक शेतकऱ्यांनी माळरानावर चिंचेची लागवड केली आहे. चिंचेचे झाड हे बहुपयोगी असते. चिंचेपासून मिळणाऱ्या चिंचोक्‍यांचा उपयोग अनेक उद्योगांमध्ये केला जातो. त्यातीलच एक उद्योग म्हणजे माण तालुक्‍यातील वरकुटे मलवडी आणि आटपाडीमधील झरे येथे घोंगडी तयार करण्याचा व्यवसाय केला जातो. या उद्योगात घोंगड्यास खळ देण्यासाठी चिंचोक्‍यांचा उपयोग होतो. टरफले वीटभट्टी व्यावसायिक विकत घेतात. चिंचेच्या पानांना आयुर्वेदातही चांगले महत्त्व आहे.

1 डिसेंबरपासून रेल्वेसेवा थांबणार? पाहा काय आहे Viral Message चे सत्य


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!