मनमोहक रुपात सिद्धनाथ-माता जोगेश्वरी; विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनाने भाविकांची इच्छा पुरी!


 

स्थैर्य, कोपर्डे हवेली, दि.२५: येथील श्री सिध्दनाथ मंदिरात नवरत्न काळात पोषाखाव्दारे देवाला विविध रुप देऊन पूजा बांधण्यात येते. आज बुधवारचे औचित्य साधून श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरीची विठ्ठल-रखुमाईच्या रुपात पूजा बांधण्यात आली. त्यामुळे आज बुधवारी भाविकांना विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेता आले.

भक्तीमय वातावरणात गावचे पुजारी महादेव गुरव, दत्तात्रय गुरव, कृष्णात गुरव व त्यांच्या कुटुंबातील सदस्य नवरत्न काळातील बारा दिवस श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरीची विविध रुपातील आकर्षक पूजा बांधतात. १९९५ साली सिध्दनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला, तेव्हापासून ही पोशाखाची परंपरा अखंड सुरू आहे. याच काळात मंदिर विद्युत रोषणाईने सजवले जाते. गावातील विद्युत क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी व सर्व युवक मिळून हे विद्युत रोषणाईचे काम करतात. दरम्यान, आजच्या या पूजेमुळे भाविकांना पंढरपुरात न जातही कोपर्डे हवेलीत विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेता आले. यावेळी भाविकांनी संयोजकांसह देवस्थान समितीचे आभार मानले.

विठुमाऊलीची सेवा करणाऱ्या दाम्पत्याला मिळाला कार्तिक एकादशीच्या महापूजेचा मान


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!