स्वदेशी भारत सन्मान पुरस्काराने ज. तु. गार्डे सन्मानित

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. 1 डिसेंबर 2023 | फलटण | विठ्ठल पडर यांजकडून | श्री काळेश्वर ग्राम विकास प्रतिष्ठान, आसुच्या वतीने दिल्या जाणारा “स्वदेशी भारत सन्मान पुरस्कार 2023” नुकताच ज्येष्ठ लेखक ज. तु. गार्डे यांना प्रदान करण्यात आला.

सदर कार्यक्रमास फलटण सातारा जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, माजी प्राचार्य सुधीर इंगळे, हनुमंत चांदुगडे, स्वाती पाटील, जीवन इंगळे हे उपस्थित होते.

सदर पुरस्कार हुतात्मा राष्ट्र बंधू राजीव भाई दिक्षित यांच्या स्मरणार्थ स्वदेशी दिनादिवशी दिला जातो. सदर पुरस्कार “ज. तु. गार्डे” यांच्या घातपात या प्रसिद्ध कादंबरीला मिळाला आहे.

सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल गार्डे यांचे सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक क्षेत्रातून विशेष अभिनंदन होत आहे.

Back to top button
Don`t copy text!