सूर्या रोशनीने मिक्सर ग्राइण्डर्सची नवी श्रेणी लाँच केली

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. १४ जुलै २०२२ । मुंबई । सूर्या रोशनी या भारतातील आघाडीच्या फास्ट मूव्हिंग इलेक्ट्रिकल गूड्स (एफएमईजी) कंपनीने आधुनिक घरांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी नुकतेच मजबूत, अधिक सुरक्षित व उच्च कार्यक्षम मिक्सर ग्राइण्डर्सची नवीन सिरीज लाँच केली आहे. नवीन सिरीज ५०० व ७५० वॅट्स पॉवर मोटर्स, तसेच भारतीय कूकिंगसाठी अनुकूल अशा अतिरिक्त ग्राइण्डिंग कार्यक्षमतेसह येते. या सिरीजमध्ये ३ मिक्सर ग्राइण्डर्स आहेत – पॉवर मॅक्स (७५० वॅट), ब्लिस मिक्सर ग्राइण्डर (५०० वॅट) आणि गॅलॅक्सी-आय (७५० वॅट). हे तिन्ही मिक्सर ग्राइण्डर्स सब-२००० रूपयांच्या किंमतीमध्ये पैशाचे मोल देतात आणि सूर्या रोशनीच्या सुप्रसिद्ध व्हॅल्यू-फॉर-मनी ऑफरिंग्जशी पूरक असतील.

विशेषत: वर्षानुवर्षे टिकाऊपणासाठी डिझाइन करण्यात आलेली मि‍क्सीजची नवीन श्रेणी सूर्या रोशनीच्या आरअॅण्डडी टीमने स्वदेशी विकसित केली आहे आणि आजच्या आधुनिक व अत्याधुनिक ग्राहकांसाठी सानुकूलरित्या डिझाइन करण्यात आली आहे. या श्रेणीमध्ये उच्च दर्जाची कार्यक्षमता व आकर्षकतेचे अद्वितीय संयोजन आहे.

सूर्या रोशनी मिक्सर ग्राइण्डर्सच्या नवीन सिरीजमध्ये ५ वर्षांची मोटर वॉरंटी देखील देते. यामध्ये उत्पादनावर २ वर्षांच्या कॉम्प्रेहेन्सिव्ह वॉरंटीचा समावेश आहे आणि मिक्सीजसोबत ३ जार्स देखील येतात.

सूर्या रोशनीच्या कन्झ्यूमर ड्युरेबल्सचे व्यवसाय प्रमुख विशाल अखौरी म्हणाले, “आम्हाला मिक्सर ग्राइण्डर्सची तीन नवीन व उदयोन्मुख श्रेणी लाँच करण्याचा आनंद होत आहे, ज्यामधून उत्तम डिझाइन व उच्च दर्जाप्रती आमच्या ब्रॅण्डची स्थिर कटिबद्धता दिसून येते. यामुळे ग्राहकांमध्ये सर्वात पसंतीचा ब्रॅण्ड म्हणून आमचे स्थान अधिक दृढ होईल. आम्‍ही तंत्रज्ञान व स्टायलिश आकर्षकतेच्या प्रमुख आधारस्तंभांवर आधारित नवीन उत्पादने सादर करणे सुरूच ठेवू, ज्यामुळे ग्राहकांच्या मनामध्ये नवोन्मेष्कारी ब्रॅण्ड म्हणून सूर्या रोशनीचे स्थान अधिक दृढ होईल.”

नवीन लाँच करण्यात आलेले मिक्सीज विविध रंगांच्या पर्यायांमध्ये येतात, जे परिपूर्ण असण्यासोबत अत्याधुनिक ग्राहक व त्यांच्या समकालीन घरांसाठी आकर्षकरित्या डिझाइन करण्यात आले आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!