दैनिक स्थैर्य | दि. २९ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांचे २५ ऑटोबर २०२३ पासून आंतरवली सराटी, ता. अंबड, जि. जालना येथे मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळण्यासाठी उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा म्हणून फलटण तालुयातील मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाकडून साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणास फलटण तालुका माहेश्वरी समाज यांच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला आहे. समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फलटण येथील साखळी उपोषण स्थळावर जाऊन आपला पाठिंबा दिला आहे
फलटण तालुका माहेश्वरी समाज नेहमीच मराठा समाजाबरोबर आहे व राहणार आहे, असे यावेळी समाजाच्या वतीने सांगण्यात आले.
पाठिंबा देताना माहेश्वरी समाजाचे बाळकृष्ण भट्टड, कुमार भट्टड, भरत करवा, राधेश्याम करवा, संदीप भट्टड, बालमुकूंद भट्टड, सचिन चांडक, जगदीश करवा, विठ्ठल चांडक, कमलकिशोर भट्टड, दीपक करवा, संदीप करवा, प्रसाद करवा, विजय करवा, पुरूषोत्तम करवा आदी उपस्थित होते.