दैनिक स्थैर्य | दि. 29 ऑक्टोबर 2023 | कोळकी | येथील पत्रकार तथा साप्ताहिक लोकपार्थ एक्सप्रेसचे संस्थापक राजेंद्र पोरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी व मुलगा असा परिवार आहे.
पत्रकार राजेंद्र पोरे यांनी यापूर्वी दैनिक स्थैर्य, दैनिक ग्रामोद्धार, दैनिक ऐक्य व दैनिक पुण्यनगरी येथे काम केले. त्यानंतर त्यांनी दैनिक लोकपार्थचे कार्यकारी संपादक म्हणून सुद्धा कामकाज केले होते.