ग्रामविकास, सहकार आणि उच्च शिक्षण विभागाच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. ०४ मार्च २०२२ । मुंबई । ग्रामविकास, सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग यासह उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या सन २०२२ -२०२३ या वर्षाच्या पुरवणी मागण्या विधानसभेत आज मंजूर करण्यात आल्या.

या पुरवणी मागण्यांवरील झालेल्या चर्चेत सदस्यांनी सूचना केल्या. या सूचनांचा सकारात्मक विचार करुन त्याविषयीच्या कार्यवाहीबाबत सदस्यांना कळविण्यात येणार असल्याचे यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि सहकार मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.

Back to top button
Don`t copy text!