
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, फलटण : येथील ज्येष्ठ पत्रकार सुधीर मनोहर उंडे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झालेले आहे. सुधीर उंडे यांनी दैनिक पुढारी, दैनिक केसरी या वृत्तपत्रांसाठी फलटण येथून प्रतिनिधी म्हणून काम केलेले आहे.
स्व. सुधीर उंडे यांनी फलटण येथून दैनिक पुढारी या वृत्तपत्रासाठी कार्यरत असताना त्यांनी पत्रकारिता क्षेत्राच्या माध्यमातून विविध सामाजिक, शैक्षणिक विषयांच्या समस्या सोडवण्यासाठी आपल्या पत्रकारितेचा उपयोग केला.
सुधीर उंडे यांच्या पश्चात मुले सुना नातवंडे असा परिवार आहे.
