राष्ट्रीय सांस्कृतिक युवा महोत्सवात मुधोजी महाविद्यालयाच्या ओम शिंदे व ओंकार दाणे या विद्यार्थ्यांचे यश

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. ३ मार्च २०२३ | फलटण |
विद्यापीठ स्तरावरील राष्ट्रीय सांस्कृतिक युवा महोत्सवात मुधोजी महाविद्यालयाच्या कलाविष्कार विभागाच्या दोन विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या संघातून सहभाग घेतला होता. या संघाने सामूहिकररीत्या सादर केलेल्या लोकनृत्य व सांस्कृतिक दिंडी प्रकाराला सुवर्णपदक मिळाले आहे. तसेच लोकसंगीत व वाद्यवृंदला कांस्यपदक प्राप्त झाले आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या संघातून सहभागी झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील सांस्कृतिक युवा महोत्सवात फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालयातील कलाविष्कार विभागातील ओम शिंदे व ओंकार दाणे या दोन विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक दिंडी व लोकनृत्य स्पर्धेत सुवर्णपदक तसेच लोकसंगीत वाद्यवृंद कलाप्रकारात कांस्यपदक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संघात या दोघांचा समावेश होता. या स्पर्धा अखिल भारतीय विशवविद्यालय राष्ट्रीय युवा महोत्सव जैन विद्यापीठ, बेंगलोर (कर्नाटक) येथे संपन्न झाल्या.

सदर विद्यार्थ्यांनी गणपत विद्यापीठ, गुजरात आयोजित पश्चिम विभागीय राष्ट्रीय स्पर्धेत उत्तम कामगिरी केली. लोकनृत्य, लोकसंगीत, वाद्यवृंद तसेच सांस्कृतिक दिंडी या कला प्रकारात आपला डंका कायम ठेवला. या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Back to top button
Don`t copy text!