
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य | दि. ३ मार्च २०२३ | फलटण |
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदानाची आठवण म्हणून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान हे दरवर्षी संपूर्ण फाल्गुन महिना ‘धर्मवीर बलिदान मास’ म्हणून पाळतात. राज्यभर मोठ्या संख्येने धारकरी या व्रताचे पालन करत असतात. याच बलिदान मासानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, फलटण विभाग यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. ५ मार्च रोजी महाराजा मंगल कार्यालय, फलटण येथे सकाळी ८.०० वाजल्यापासून या रक्तदान शिबिरास सुरुवात होणार आहे.
या रक्तदान शिबिरास सर्व शिवभक्त, धारकरी, वारकरी व फलटण तालुक्यातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहून आपले सामाजिक कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या सर्व धारकर्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
