कटफळच्या विद्यार्थ्यांचे तायक्वांदो स्पर्धेत यश


दैनिक स्थैर्य । दि. २२ नोव्हेंबर २०२२ । बारामती । कटफळ येथील अब्बास मोहम्मद हुसेन एज्युकेशन ट्रस्ट संचलित झैनबिया स्कूलच्या १३ पैकी ६ विद्यार्थ्यांचा तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत यश मिळविले असून त्यांचे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बारामतीतील तालुका क्रीडा संकुल माळेगाव येथे तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत 14 वर्षे वयोगटात मुलांमध्ये श्रेयश बिटके व मुलींमध्ये समीक्षा नाईक, आदिती लोखंडे. 17 वर्ष मुलांमध्ये:- मोहसीन तांबोळी तर मुलींमध्ये:- श्रेया बिटके, संजना सस्ते, संस्कृती लोणकर यांनी विजेतेपद मिळविले त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड झाली. तसेच मानस नाईकडे, चैतन्य गिरमे, आयुष सागवेकर, संतोष जादौन, संस्कृती मुळे, सायली मानसवार, आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
स्कूलच्या प्राचार्या. इन्सिया नासिकवाला यांनी सर्व मार्गदर्शक क्रीडाशिक्षक आप्पासाहेब देवकाते, विशाल हडंबर,नेहा गावडे यांचे व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.


Back to top button
Don`t copy text!