
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, फलटण दि.३०: फलटण नगरपालिकेने बेघर निराधारांसाठी निवारा घर उभारण्याचा निर्णय घेतला असून मोरेश्वर शिक्षण व सामाजिक संस्थेच्या पाठपुराव्याला यश मिळाले असल्याचे संस्थेचे अध्यक्ष हनुमंत मोरे (मामा) यांनी सांगितले.
निराधार बेघर लोकांसाठी निवार्याची सोय व्हावी यासाठी गेले अनेक दिवस संस्थेच्या माध्यमातून आपण पालिकेपासून मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला होता. नुकताच पालिकेने याबाबत निर्णय घेतल्याने आपल्या पाठपुराव्याला यश आले आहे असे सांगून या निर्णयाबद्दल प्रशासन व फलटण नगरपालिकेला हनुमंत मोरे यांनी धन्यवाद दिले आहेत.
