सातार्‍यात मुली, महिलांसमोर अश्लील चाळे करणारा संशयित जेरबंद

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. २६ ऑगस्ट २०२६ | सातारा |
सातारा शहरात काही दिवसांपासून खासगी क्लासला जाणार्‍या अल्पवयीन मुलींसह विविध ठिकाणी महिलांची छेड काढण्याचे प्रकार घडत होते. त्यामुळे मुलींमध्ये भीतीचे वातावरण होते. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस रात्रंदिवस संशयिताचा माग काढत होते. अखेर त्याला शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

विनोद मोहन कामटे (वय ४०, सध्या रा. सैदापूर, ता. सातारा, मूळ रा. जातेगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, पोवई नाका परिसरात अनोळखी व्यक्तीने खासगी क्लासमध्ये शिकणार्‍या एका अल्पवयीन मुलीस जवळ बोलावून तिच्यासमोर लैंगिक चाळे केले. या प्रकरणाची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर संशयिताचा सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपास सुरू झाला. मुलीसोबत खाजगी क्लासमध्ये गैरकृत्य केले असताना त्याने आणखी २ ते ३ विविध ठिकाणी महिलांसमक्ष लैंगिक चाळे केल्याचे तसेच छेड काढल्याचे फुटेजवरून स्पष्ट झाले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!