दुधेबावी फेस्टिव्हलमध्ये किशोर कुमार शहा यांना उद्योगरत्न; ग्रामीण भागातील उपक्रम प्रेरणादायी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›
दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित दुधेबावी फेस्टिव्हलमध्ये चंदुकाका सराफ प्रायव्हेट लिमिटेड बारामतीचे चेअरमन किशोर कुमार शहा यांना राज्यस्तरीय उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. ग्रामीण भागात सातत्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबवणे आणि प्रबोधन करणे ही बाब निश्चितच प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.
स्थैर्य, फलटण, दि. १४ नोव्हेंबर : फलटण तालुक्यातील दुधेबावी येथे आयोजित दुधेबावी फेस्टिव्हलमध्ये विविध मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय उद्योगरत्न पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रतिष्ठानच्यावतीने उल्लेखनीय सामाजिक व औद्योगिक योगदानाबद्दल चंदुकाका सराफ प्रायव्हेट लिमिटेड बारामतीचे चेअरमन किशोर कुमार शहा यांना राज्यस्तरीय उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती अनिल पानसरे, कुंडल वन प्रबोधिनीचे प्रशासक हरिश्चंद्र वाघमोडे, पश्चिम महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष हनुमंतराव सोनवलकर, पंचायत समितीचे सदस्य विजयाताई सोनवलकर, सरपंच भावनाताई सोनवलकर आणि चक्रधर ऍग्रो मशिनरीचे संस्थापक संपतराव नाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

ग्रामीण प्रबोधन आणि विकासाचे महत्त्व

सलग २६ वर्षे ग्रामीण भागात व्याख्यानमालेच्या रूपाने प्रबोधन करणे ही बाब सोपी नसून, अडचणींवर मात करून अध्यक्ष शशिकांत सोनवलकर व पदाधिकाऱ्यांनी घेतलेले परिश्रम कौतुकास्पद असल्याचे किशोर कुमार शहा यांनी सांगितले. संगणकीय युगात अशी व्याख्यानमाला यशस्वीपणे राबवणे ग्रामीण संस्कृतीला बळ देणारे असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी बोलताना पश्चिम महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष हनुमंतराव सोनवलकर यांनी दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू असलेली संत गाडगेबाबा व्याख्यानमाला गावाचा सांस्कृतिक वारसा अधिक समृद्ध करणारी असल्याचे स्पष्ट केले. तर उद्योजक राजेंद्र नाळे यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि नवउद्योजकांसाठी हा उपक्रम नेहमीच प्रेरणादायी ठरत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्याख्यानमाला कमिटीचे अध्यक्ष डॉ. सागर कराडे यांनी केले तर सूत्रसंचालन उपाध्यक्ष विजयकुमार नाळे व खजिनदार डॉ. युवराज एकळ यांनी केले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!