फलटणमध्ये लायन्स क्लबतर्फे मधुमेह जनजागृती व नेत्र तपासणी शिबिर संपन्न

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

लायन्स क्लब ऑफ फलटणच्या वतीने आयोजित मधुमेह जनजागृती आणि अंधत्व निवारण शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, याद्वारे आरोग्याची तपासणी करण्यात आली.

स्थैर्य, फलटण, दि. १४ नोव्हेंबर : सामाजिक बांधिलकी जपत समाजाच्या आरोग्यविषयक गरजांना प्राधान्य देण्याच्या उद्देशाने लायन्स क्लब ऑफ फलटणच्या वतीने जागतिक मधुमेह जनजागृती दिन आणि अंधत्व निवारण दिनानिमित्त विशेष आरोग्य उपक्रम राबवण्यात आला. माळजाई मंदिर व उद्यान परिसरातील लायन्स मुधोजी चॅरिटेबल आय हॉस्पिटल येथे शनिवार, दि. १४ नोव्हेंबर रोजी हे उपक्रम उत्साहात पार पडले.

मधुमेह जनजागृती व मोफत आरोग्य तपासणी

डॉ. सुभाष गुळवे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या शिबिरात माळजाई मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविक, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि रुग्णांची मोफत रक्तातील साखरेची तपासणी करण्यात आली. यावेळी डॉ. गुळवे यांनी मधुमेह होण्याची कारणे, शरीरावर होणारे दुष्परिणाम आणि नियंत्रणासाठी घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन केले. नियमित चालणे, व्यायाम, संतुलित आहार आणि वजन नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

अंधत्व निवारण व नेत्रआरोग्य समुपदेशन

अंधत्व निवारण दिनानिमित्त हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या रुग्णांसाठी नेत्रआरोग्यविषयक समुपदेशन करण्यात आले. डोळ्यांची नियमित तपासणी, दृष्टिदोषाची वेळीच ओळख आणि नेत्रविकारांवरील उपचारांबाबत माहिती देण्यात आली. याप्रसंगी अध्यक्ष रणजीत बर्गे, प्रमोद निंबाळकर, दिलीप शिंदे, चंद्रकांत कदम, रतनसीभाई पटेल यांच्यासह वैद्यकीय कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!