फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा; नगरसेविका सिद्धाली शहा यांची जर्मनीतील ‘युथ ॲक्शन समिट २०२७’साठी निवड

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

जगातील सर्वात तरुण महिला नगरसेविका कु. सिद्धाली शहा यांची जर्मनीच्या बर्लिन शहरात होणाऱ्या ‘युथ ॲक्शन समिट २०२७’साठी युथ डेलिगेट म्हणून निवड झाली आहे.

स्थैर्य, फलटण, दि. १४ नोव्हेंबर : जगातील सर्वात तरुण महिला नगरसेविका म्हणून ओळख असलेल्या फलटण नगरपरिषदेतील प्रभाग क्र. ८ च्या नगरसेविका कु. सिद्धाली शहा यांची जर्मनीतील बर्लिन येथे होणाऱ्या ‘युथ ॲक्शन समिट २०२७’ (Youth Action Summit 2027) साठी ‘युथ डेलिगेट’ म्हणून अधिकृत निवड झाली आहे. या जागतिक परिषदेत त्यांना जगभरातील १२५ हून अधिक देशांतील प्रतिनिधींसमोर आपले विचार मांडण्याची विशेष संधी (Speaking Opportunity) मिळाली आहे.

परिषदेचे स्वरूप आणि जागतिक सहभाग

सेंटर फॉर डिप्लोमॅटिक ॲडव्हान्समेंट (CDA) या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने ११ ते १४ जानेवारी २०२७ या कालावधीत जर्मनीची राजधानी बर्लिन येथील हॉटेल एमओए (MOA) येथे या जागतिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या चार दिवसीय परिषदेत युथ लीडरशिप, सार्वजनिक धोरण, मुत्सद्देगिरी, हवामान बदल, शांतता प्रस्थापित करणे आणि शाश्वत विकास यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा होणार आहे.

भारताचे प्रतिनिधित्व आणि विशेष संधी

या समिटसाठी जगभरातील युवा नेते, धोरणकर्ते, अभ्यासक आणि उद्योजकांना आमंत्रित करण्यात आले असून, यात भारताचे प्रतिनिधित्व करताना शहा यांना सामावून घेण्यात आले आहे. परिषदेदरम्यान त्यांना की-नोट सेशन्स, पॅनेल डिस्कशन, संस्थात्मक भेटी आणि संवाद कार्यशाळांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

मान्यवरांचे मार्गदर्शन

आपल्या या निवडीबद्दल बोलताना शहा यांनी नमूद केले की, या राजकीय आणि सामाजिक प्रवासात त्यांना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर व जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे मार्गदर्शन व प्रेरणा लाभत आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!