विद्यार्थ्यांनी कृषी शिक्षणात स्वावलंबी व आधुनिक ज्ञान घेणे आवश्यक- कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील


दैनिक स्थैर्य | दि. २७ मार्च २०२४ | फलटण |
विद्यार्थ्यांनी कृषी शिक्षणात स्वावलंबी व बदलत्या काळानुसार आधुनिक ज्ञान घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी केले.

श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटणचा वार्षिक पारितोषिक वितरण व वार्षिक स्नेहसंमेलन समारंभ उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रशांतकुमार पाटील, कुलगुरू, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी, फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण उपस्थित होते.

कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. शरदराव रणवरे, व्हॉईस चेअरमन, महाविद्यालयीन समिती, श्री. आर. एच. पवार, सदस्य, महाविद्यालयीन समिती, श्री. अनिलराव घोरपडे, सदस्य, महाविद्यालयीन समिती, श्री. रणजित निंबाळकर सदस्य, महाविद्यालयीन समिती, श्री. अरविंद निकम, प्रशासन अधिकारी, फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण, मालोजीराजे शेती विद्यालयाचे प्राचार्य श्री. ज्ञानेश्वर कोळेकर, तंत्रनिकेतन विद्यालयाचे प्राचार्य श्री. माने सर, मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य श्री. गंगावणे सर कार्यक्रमाला उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन व प्रतिमापूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटणचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण यांनी केली. यानंतर श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण येथील शैक्षणिक वर्षामधील शैक्षणिक प्रगतीचा अहवाल कु. साक्षी जाधव, सभापती, विद्यार्थी परिषद तसेच कृषि महाविद्यालय, फलटण येथील शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील शैक्षणिक प्रगतीचा अहवाल कु. दिव्या बोंद्रे, सभापती, विद्यार्थी परिषद यांनी सविस्तर वाचन केले. यानंतर श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण येथील शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील दोन्ही महाविद्यालयाच्या शैक्षणिक व इतर कामकाजासंबधी ‘मृदुगंध’ या नियतकालिकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण यांनी लिहिलेल्या ‘वस्तूनिष्ठ प्रश्नसंच अन्न तंत्रज्ञान’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.

‘मृदुगंध’ या नियतकालिकाची छपाई श्री. महेश शिंदे, व्यवस्थापक, यशवंत ऑफसेट, फलटण यांनी कमीतकमी वेळेत केल्यामुळे त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते घेण्यात आला. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक व विविध स्तरावरील स्पर्धेतील विद्यार्थ्यांचे गौरव चिन्ह, पारितोषिक व प्रशस्ती पत्र देऊन विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व कुलगुरू मा. डॉ. प्रशांतकुमार पाटिल, यांनी मार्गदर्शन करताना पारितोषिक मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच युवा पिढीसाठी असणारे विचार मंथन व समायोजन, करिअरमधील व भविष्यातील विचार विनिमय, बदलत्या विश्वानुसार असणार्‍या कृषि संबंधित भविष्यातील संधी, महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांची प्रशासनातील व कृषि व्यवसायातील यशाची वाटचाल, उद्यानशास्त्र व कृषि शास्त्राचे महत्व व आधुनिक काळातील संधी, सध्याचे जागतिक तापमान बदलाचे आवाहन, कृषीतील कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रयोग आणि विद्यार्थी जीवनातील स्वावलंबी शिक्षण, या विषयवार उपस्थित विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पारितोषिक मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच उच्च शिक्षणातील कृषि क्षेत्राची सध्याची परिस्थिती, कृषीतील विद्यार्थ्यांची भविष्यातील संधी, परिश्रमातून मिळणारे यश, प्रात्यक्षिक ज्ञान सुधारणा, बदलत्या शेतीची सध्याची परिस्थिती याबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

सूत्रसंचालन डॉ. गणेश अडसूळ, कुमार प्रथमेश जायपत्रे, कुमारी समृध्दी कुंजीर, प्रा. अश्विनी ससाणे, प्रा. नीलिमा ढालपे, प्रा. विक्रम साबळे यांनी केले, तर आभार प्रा. स्वप्निल कश्यप यांनी मानले.

कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील क्रीडा विभाग, प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.


Back to top button
Don`t copy text!