फलटणमधून महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळणार नाही; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले मत

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. 27 मार्च 2024 | पुणे | विशेष प्रतिनिधी | महायुतीच्या माध्यमातून माढा लोकसभा मतदारसंघासाठी जो उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. त्या उमेदवाराचे काम हे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते करू शकत नाहीत. त्यामुळे फलटण मतदारसंघांमधून महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळाले नाही. तर याबाबत आम्हाला ग्राह्य धरू नये; असे स्पष्ट मत फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासमोर व्यक्त केले.

आज माढा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची बैठक उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी फलटण येथून गेलेले प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विद्यमान खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. माढा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळाला पाहिजे; अशी आग्रही मागणी विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी केली होती.

परंतु माढा लोकसभा मतदारसंघांमधून महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीने उमेदवार घोषित केल्यामुळे आगामी काळात महायुतीच्या उमेदवाराला विधानसभा मतदारसंघांमधून मताधिक्य मिळणे अवघड आहे; असेही मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांचा मेळावा नुकताच आयोजित करण्यात आला होता. यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला न सुटल्यामुळे महायुतीच्या विद्यमान उमेदवाराचे काम कोणीही करू शकत नाही; असे मत विविध कार्यकर्त्यांनी त्यावेळी व्यक्त केले होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!