दैनिक स्थैर्य | दि. 20 एप्रिल 2023 | फलटण | काँग्रेसला एक जुनी परंपरा आहे. काँग्रेसचे विचार हे तळागाळापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. पूर्वीपासून भारतामधील प्रत्येक गावामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते हे आहेत. आगामी काळामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे विचार फलटण शहरासह तालुक्यातील तळागाळातील माणसापर्यंत पोहोचवण्याची काम व फलटण तालुक्यामधील काँग्रेस संघटना बळकट करण्याचे काम पदाधिकाऱ्यांनी करावे, असे आवाहन राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केले आहे
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष तथा आमदार नाना पटोले व सातारा जिल्हा काँग्रेसचे प्रभारी श्रीरंगनाना चव्हाण – पाटील दौऱ्यावर असताना फलटण येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकात राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी डॉ. सचिन बेडके व फलटण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र बेडके यांनी त्यांचे फलटण शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने स्वागत करुन सत्कार केला. त्यावेळी नाना पटोले बोलत होते.
यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष पंकज पवार, तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष अमीर शेख, जिल्हा सरचिटणीस शंकर लोखंडे, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष अजिंक्य कदम, जिल्हा उपाध्यक्ष गंगाराम रणदिवे, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र खलाटे, अशोक शिंदे तसेच फलटण तालुका व शहर काँग्रेसचे आणि पक्षाच्या विविध सेलचे अध्यक्ष व पदाधिकारी मनोहर गायकवाड, लक्ष्मण शिंदे, विकास ननवरे, मंजेखान मेटकरी, चंद्रकांत पवार, नितीन जाधव, अभिलाष शिंदे, अनिल खोमणे, धनंजय गोरे यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.