मुरघासाची साठवण करा, जनावरांचे पोषण वाढवा!

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांचे आवाहन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. २ डिसेंबर २०२४ | फलटण |
फलटण तालुक्यातील रावडी बु. येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटीअंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीदूतांनी ग्रामीण जागरुकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४-२५ कार्यक्रमांतर्गत कृषीविषयक मुरघास तयार करण्याचे प्रात्यक्षिक दिले.

या कार्यक्रमात कृषीदूतांनी फुलोरा अवस्थेतील मका वापरून उच्च दर्जाचे मुरघास कसे तयार करता येते, याबाबत सांगितले. प्रात्यक्षिकादरम्यान मुरघास तयार करण्याची प्रक्रिया, लागणारी साधने व पद्धती आणि मुरघास तयार करण्याच्या प्रक्रियेमुळे पशुपालनात मोठा फायदा होऊ शकतो, असे कृषीदूत म्हणाले. मुरघास तयार केल्याने पशुधनाला पौष्टिक आहार मिळतो व दूध उत्पादनात वाढ होते. या प्रात्यक्षिकाला शेतकर्‍यांनीदेखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि प्रश्न विचारून अधिक माहिती मिळवली.

कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे मॅडम, कार्यक्रम अधिकारी प्रा. नीतीशा पंडित मॅडम व प्रा. लाळगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत जगताप प्रजोत, कदम रोहन, गौंड अनिकेत, गरगडे प्रणव, गोलांडे तुषार, गुरव ओमकार, सार्थक शेंडगे यांनी प्रात्यक्षिक करून दाखवले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!