बिनबुडाचे आरोप बंद करा; अन्यथा भुयारी गटार योजनेतले उद्योग आम्हाला सांगावे लागतील : प्रितसिंह खानविलकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 19 सप्टेंबर 2024 | फलटण | फलटण पालिकेतील तक्रारबहाद्दर माजी नगरसेवकाने सत्ताधार्‍यांविरोधात केलेल्या सर्व तथ्यहीन तक्रारींचा निकाल त्यांच्या विरोधात लागलेला आहे. त्यांनी आजवर कोर्टात जायचं फक्त नाटकं केलं आहे. त्यांनी असे बिनबुडाचे आरोप करणे बंद करावे अन्यथा भुयारी गटार योजनेतले त्यांचे उद्योग आम्हाला सांगावे लागतील, असा इशारा राजे गटाचे कट्टर समर्थक प्रितसिंह खानविलकर यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिला आहे.

माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी काही दिवसांपूर्वी राजे गटावर टिका करताना पालिकेत विकासकामांच्या नावाखाली भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता; त्याला प्रतिउत्तरादाखल प्रितसिंह खानविलकर यांनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे.

प्रितसिंह खानविलकर यांनी पुढे नमूद केले आहे की, ‘‘आपण वारकरी असल्याचा आव आणून त्यांच्यावर होणारी टिका ते वारकरी सांप्रदायाचा अपमान असल्याचा बनाव ते करु पाहत आहेत. मुळात ज्यांना घरी जायला रस्ता पुरत नाही; स्वत:चे घर सापडत नाही त्यांनी अशा पोकळ वलग्ना करणे बंद करावे.’’

‘‘आता त्यांनी आमच्या नेतृत्त्वाला परत पुण्याला पाठवायची भाषा सुरु केली आहे. अशी बाष्कळ बडबड करण्याआधी त्यांनी त्यांच्या नेतृत्त्वाला लोकसभेला जनतेने घरचा रस्ता दाखवला आहे; हे ध्यानात घ्यावे. आमच्या नेतृत्त्वाचे काय करायचे ते जनता ठरवेल; त्यांनी त्याची चिंता करायचे काहीही कारण नाही’’, असा टोलाही प्रितसिंह खानविलकर यांनी लगावला आहे.


Back to top button
Don`t copy text!