फलटण शहर हद्दीतील चोरीची मोटरसायकल सापडली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १४ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
फलटण शहर हद्दीतून चोरीस गेलेली मोटरसायकल फलटण ग्रामीण पोलिसांना सापडली आहे.

फलटण शहर महात्मा फुले चौकातून दि. ३ नोव्हेंबर रोजी ‘पॅशन प्रो’ गाडी क्रमांक एम-एच-११-बीजी-६०९ ही चोरीस गेली होती. याबाबत शहर पोलीस ठाण्यास ६७२/ २०२३ कलम ३७९ भादविप्रमाणे गुन्हा दाखल आहे.

सध्या फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोबींग ऑपरेशन राबवण्यात येत आहे. त्यावेळी सोमंथळी या ठिकाणी एक बेवारस वरील क्रमांकाची गाडी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सदर गाडी ताब्यात घेतली असता फलटण शहरात चोरी झाल्याबद्दल तिच्याबाबत गुन्हा दाखल असल्याचे समजल्याने सदरची गाडी फलटण शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण भागात काही तांडे आहेत त्या तांड्यावरसुद्धा कोबिंग ऑपरेशन राबवण्यात येत आहे. यापुढे मोटरसायकलचे सर्व कागदपत्रे ऑनलाईन तपासण्यात येणार आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, पोलीस उपाधीक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस उपनिरीक्षक सागर आरगडे-दीक्षित, तात्या कदम, जगदाळे, खरात यांनी केलेली आहे.


Back to top button
Don`t copy text!