
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, सातारा, दि.२४ : पुनःश्च हरिओम करताना येणार्या विविध अडचणींवर राज्य शासनाचे आवश्यक ते सहकार्य करणे आवश्यक आहे. तसेच यापुढे हि काही कायम स्वरूपी उपाय योजना राज्य शाशनाने कराव्यात. असे व अनेक प्रश्न घेऊन कलाकार मंडळींचे शिष्ठमंडळ नुकतेच सांस्कृतिक कार्यमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांची भेट घेतली. सांस्कृतिक कार्य मंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांची प्रशांत दामले, दिलीप जाधव, चंद्रकांत लोकरे, वैजयंती आपटे, अमेय खोपकर यांनी नाटक आणि करमणूक क्षेत्रातील सद्य परिस्थिती वर सविस्तर चर्चा केली. कलाकारांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी राज्य शाशन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी या वेळी दिली.
