साताऱ्यात हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी आयोजित महिलांच्या इफ्तार पार्टीला उत्स्फूर्त प्रतिसाद


दैनिक स्थैर्य । दि.३० एप्रिल २०२२ । सातारा । सातारा शहराचा लौकिक हा शांतताप्रिय, सलोख्याने नांदणारे शहर असा आहे. एकमेकांसोबत सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने या शहरात नांदतात. पुरोगामी विचारांची परंपरा असणाऱ्या या शहरात गेल्या 15 वर्षापासून हिंदू – मुस्लिम महिलांची इफ्तार पार्टी साजरी होते.

गेल्या दोन वर्षाच्या कोरोना महामारी मुळे यात खंड पडला. यावर्षी गुरुवार दि. 28 एप्रिल रोजी संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत मुक्तांगण , गुरुवार पेठ, सातारा येथे साजरी झाली.

मोठ्या संख्येने हिंदू मुस्लीम मैत्रिणी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. जातीय सलोखा कायम आबाधित राहिल यासाठीच महात्मा गांधी, शाहू ,फुले, आंबेडकर आणि सावित्रीमाई फातिमा , कर्मवीर भाऊराव पाटील यांचा वारसा आणि विचार घेऊन पुढील काळात राज्य आणि देशामध्ये धार्मिक जातीय सलोखा नांदावा यासाठी हिंदू मुस्लिम महिलानी रोजा ठेवला आणि एकत्र येऊन रोजा सोडला. मस्लिम महिला व पुरुषांसाठी नमाज पठणाची स्वतंत्र व्यवस्था केली हाती. सर्वांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. मोठ्या संख्येने हिंदू मुस्लिम महिला आणि पुरुष यावेळी उपस्थित होते.

यावेळी प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम राजीव मुळ्ये, भानुदास गायकवाड, सलीम अत्तार यांनी सादर केला. हिना पटेल, इम्तियाज मुलाणी, हनिफा पठाण यांनी मनोगत व्यक्त केले. मिनाज सय्यद, तोहित पटेल, चंद्रकांत खंडाईत, गणेझ भिसे, जयंत उथळे, आंनद साठे, उमेश खंडझोडे, संतोष पाटील, झाकीर शेख, पत्रकार मीना शिंदे, पत्रकार प्रगती पाटील, देवकुळे, गौरी आवळे तसेच प्रा. सुवर्णा कांबळे, जमीर अत्तार उपस्थित होते.

विवेक मनुकर यांनी सुंदर आणि समर्पक बॅनर्सचे डिझाईन केले. सुंदर रोषणाई आणि संगीतमय वातावरणात इफ्तार पार्टी अतिशय उत्साहात साजरी झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एड. शैला जाधव, कैलास जाधव, एड. चैत्रा व्ही एस, प्रा. संजीव बोन्डे, माया पवार, स्वाती बल्लाळ, रुपाली मुळे, रुपाली मोहिते, हबीबा नबाब, आशा शेख, नूरजहाँ पठाण, केतन मोहिते, उमा कांबळे, सिंधू कांबळे, नाझनीन खान यांनी परिश्रम घेतले.


Back to top button
Don`t copy text!