सुश्रुत हॉस्पिटलने आयोजित केलेल्या सायकल स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद


स्थैर्य, फलटण : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सुश्रुत हॉस्पिटलच्यावतीने आयोजित केलेल्या बारामती ते फलटण – सुरवडी सायकल स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. यामध्ये 250 हून अधिक सायकलस्वार सहभागी झाले होते. 

फलटण व बारामती येथील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.हेमंत मगर यांच्या संकल्पनेतून व सुश्रुत हॉस्पिटल व बारामती सायकल क्लब यांच्या माध्यमातून बारामती ते फलटण – सुरवडी या मार्गावर 15 ऑगस्ट रोजी ही सायकल स्पर्धा पार पडली. यामध्ये 750 विविध गटातील स्पर्धकांनी आपली नावे नोंदवली होती. यापैकी 14 ते 75 वयोगटातील 250 हून अधिक सायकलस्वार हे सायकलिंग करीत सहभागी झाले होते. सकाळी 6 वाजता निघालेल्या स्पर्धकांपैकी पहिले काही स्पर्धक 7 वाजता हॉटेल निर्सग, सुरवडी येथे पोहोचले. 

यावेळी या स्पर्धकांचे स्वागत डॉ.हेमंत मगर व डॉ.मीरा मगर तसेच डॉ.सुमेध हेमंत मगर यांनी केले. कार्यक्रमास राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील यांची उपस्थिती होती. स्पर्धेसाठी प्रांताधिकारी डॉ.शिवाजीराव जगताप, उपविभागीय पोलीस अधिक्षक तानाजी बरडे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास डॉ.जगताप व सुश्रुत हॉस्पिटलचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!