तुरुंगातील कैद्यांना ड्रग्जचा पुरवठा करताना शिपायाला अटक; 28 ग्रॅम ड्रग्ज जप्त


स्थैर्य , नागपूर , दि.21: तुरूंगातील कैद्यांना तेथील कर्मचारीच मोबाईलपासून गांजा, अफीम, एमडी आदी मादक पदार्थांचा पुरवठा करीत असल्याच्या अनेक घटना उघडकीस येतात. अशीच एक घटना नागपूर मध्यवर्ती कारागृहात उघडकीस आली. २८ ग्रॅम ड्रग्ज तुरूंगात घेऊन जाताना तुरंग प्रशासनाने एका शिपायाला रंगेहाथ अटक केल्याने खळबळ माजली आहे.

तुरुंगात कैद्यांना मादक पदार्थांचा पुरवठा होत असल्याची माहिती मिळताच तुरंग प्रशासनाने खबरदारी घेत सापळा रचला. ड्यूटीवर जाणाऱ्या पाच कर्मचाऱ्यांता थांबवून त्यांची तपासणी केली असता मंगेश मधुकर सोळंकी याच्याजवळ २८ ग्रॅम गांजा सापडला. मंगेशने त्याच्या मोज्यांमध्ये गांजा लपवला होता. त्याला अटक करून धंतोली पोलिसांच्या हवाली करण्यात आले. धंतोलीचे पाेलिस निरीक्षक धनंजय पाटील या घटनेचा तपास करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!