
स्थैर्य, मुंबई, दि. २४ : “भारुड या लोककलेला देश – विदेशात ओळख मिळवून देणारे ज्येष्ठ भारुडकर निरंजन भाकरे यांच्या निधनामुळे सामाजिक भान जपणारा गुणी लोककलावंत हरपला”, अशा शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी भाकरे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
“ग्रामीण भागातील, सामान्य कुटुंबातील या अस्सल कलाकाराने आपल्या वैशिष्ट्यपूर्ण भारुड सादरीकरणामुळे सर्वांच्या मनात घर केले होते. भारुड आणि इतर लोककलांचे जतन – संवर्धन व्हावे, म्हणून त्यांनी कायम पुढाकार घेतला. त्यांचे काम रसिकांच्या कायम स्मरणात राहील”, असेही देशमुख यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.